मुखेड प्रतिनीधी:-स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने आज मंगळवार दि:-22/09/2026रोजी मुखेड तालुक्यात हवामान पुरक शेती व जलसंवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेने मुखेड तालुक्यातील 70 गावांमध्ये जुलै 2025 पासून कामाला सुरुवात केली असून कार्यशाळेसाठी 70 गावामधुन 170 महीलांची उपस्थिती होती.
कार्यशाळेचे प्रमुख मुद्दे:-1) हवामान बदलाचा सर्वाधिक फटका ग्रामीण महीला आणि शेतीला बसत आहे.
२)गट शेती, मिश्र शेती, अचुक पीक नियोजन आणि जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला शासकीय मदत.
३)पाणि टंचाईवर मात करण्यासाठी तलाव, विहिर आणि शेततळ्याचे व्यवस्थापन.
४) वाहुन जाणारी माती वाचवा -बांधावर वृक्ष लागवड आणि सेंद्रिय खतांचा वापर.
५) रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि शेद्रींय शेतीचे फायदे.
सध्याच्या वातावरणानुसार आपत्ती व्यवस्थापनावर मार्गदर्शन:-अतिव्रष्टी व अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जायभाय सर यांनी मार्गदर्शन केले.

- अ) हवामान खात्याचा इशारा WhatsApp ग्रुप द्वारे वेळेत पोहचवणे.
ब)पिक नुकसानीचा त्वरित पंचनामा व पिक विमा अर्ज.
क) शेतातील पाणी निचरा करण्यासाठी चर आणि नाला सफाई.
ड) पावसाळ्यातील साथीच्या रोगांपासून बचाव.
या कार्यक्रमासाठी शासकीय अधिकारी जायभाय सर.
स्वयंम शिक्षण प्रयोगाच्या लिलाताई सोमवंशी,पुनम मोटे आणि स्वयंम परिवार उपस्थित होता.
प्रास्ताविक लीलाताई नी केले तर आभार संघमित्रा गवले यांनी केले.