खा.अजित गोपछडे यांच्या प्रयत्नामुळे देगलुर -कर्णाटक सिमा मार्गास बजेट मंजुरी.

नांदेड:-23/06/20.

देगलुर ते कर्नाटक राज्य सीमा या महत्वपूर्ण मार्गाच्या विकासासाठी बजेट मंजुरी प्राप्त झाल्यानंतर नांदेड -बिदर महामार्गाच्या उन्नतीकरणाला नवे बळ मिळाले असुन या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन या विकास कार्याच्या संकल्पनेवर आधारित विशेष स्मृती चित्र भेट देत त्यांचा सत्कार केला व मनःपूर्वक आभार मानले.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचीही भेट घेऊन या विकास कार्याशी संबंधित विशेष स्मृती चित्र प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या महत्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यासाठी दिलेल्या सहकार्या बद्दल खा.डाॅ.गोपछडे यांनी आभार मानले.

या प्रकल्पा अंतर्गत देगलुर-करडखेल-मरखेल-हानेगाव ते कर्नाटक राज्य सीमा या मार्गाचा दर्जेदार विकास करण्यात येणार असुन नांदेड -बिदर महामार्गावरील सुमारे विस कीलोमीटरचा अंत्यंत जीर्ण व दयनीय अवस्थेतेतील भाग प्रथमच आधुनिक महामार्गाच्या दर्जानुसार विकसित करण्यात येणार आहे.

तख्त संचखंड श्री हुजुर साहेब, नांदेड ते गुरुद्वारा श्री नानक झिरा साहीब ,बिदर या दोन महत्त्वाच्या शिख तीर्थ क्षेत्रांना जोडणार्या या मार्गाला धार्मिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक दृष्टीकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या महामार्गाचे व्यापक महत्व लक्षात घेऊन प्रकल्पास आवश्यक गती आणि पाठबळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी प्रत्यक्ष भेटून मनःपूर्वक आभार मानले.

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail