संपादकीय:-आई म्हणजे देवाचं पृथ्वीवरच दुसरं रुप.
आई या शब्दाचा अर्थ कोणत्याही कोशात शोधून सापडणार नाही.कारण आई म्हणजे केवळ शब्द नसून ती एक अखंड संवेदना आहे.
आपल्या अस्तित्वाचा जो मुळ आधार आहे,ती म्हणजे आई.जगातील प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही अपेक्षा दडलेली असते,पण आईचं नातं याला अपवाद आहे.
नंऊ महीने आपल्याला स्वतः च्या उदरात वाढवणारी आणि त्यानंतरही आयुष्य भर आपल्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारी आई ही प्रेमाची चालती बोलती मुर्ती आहे.तरी तिच्या साठी आपण लहान असतो.
आपल्या ला पहीला शब्द बोलायला शिकवणारी आणि पहीलं पाऊल टाकायला शिकवणारी आई ही आपली पहिली गुरु असते.
संकट काळात न डगमगता कसं उभं राहायचं हे ती तिच्या क्रतीतुन शिकवते .जगाशी कसं वागावं आणि संस्कारांची शिदोरी कशी जपावी याचं बाळकडू आपल्या ला तिच्याकडुन मिळते.
आई हा विषय मातृदिना पुरता मर्यादित ठेवु नका.आईची काळजी घ्या.तिला आधार द्या.तिच्याशी प्रेमाने वागा.तिला कामात मदत करा.तिला मान द्या.तिला दुखःवु नका.तरच तुमचा मातृदिन यशस्वी झाला म्हणता येईल.
-संगमेश्वर बसापुरे..
