2025 च्या भिषण पुराच्या पुनर्बांधणी साठी विशेष आर्थिक पॅकेज ची मागणी -खा.डॉ.अजित गोपछडे.

महाराष्ट्रातील 2025 च्या अतिवृष्टी आणि भिषण पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पुनर्बाधणी साठी पोस्ट डीजास्टर निडस असेसमेंट PDNA ची उच्चस्तरीय बैठक तातडीने आयोजित करुन विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे .

अशी मागणी राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमीत शहा यांच्या कडे केली आहे.

याच वेळी नांदेड येथील तख्त संचखंड श्री हुजुर अबचलनगर साहीबच्या लंगर सेवेला संपूर्ण GST सुट

तसेच धर्माबाद रेल्वे स्थानकाच्या नामकरणाबाबतची स्वतंत्र निवेदन ही त्यांनी सादर केली .

नविन दिल्ली येथे झालेल्या भेटीदरम्यान डॉ.गोपछडे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे शेती, सिंचन प्रकल्प, ग्रामीण व शहरी रस्ते , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्दशनास आणुन दिले.या नुकसानीचे वैज्ञानिक, आणि वस्तू निष्ट मुल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासन , केंद्र सरकारची संबंधित मंत्रालये आणि तज्ञ संस्थाच्या सहभागातुन PDNA ची उच्चस्तरीय बैठक तातडीने आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail