लोहा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक मोर्चा.

लोहा(प्रतिनिधी) येथील जायकवाडी वसाहती मध्ये उभारलेला पंचशील ध्वज नगरपालिके मार्फत काढून टाकण्यात आल्याच्या घटनेविरोधात आंबेडकरी समाज व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आक्रमक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व पुज्य भंते पय्याबोधी महास्थवीर यांनी केले.यावेळी रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष सरपंच कीरणभाऊ घोंगडे यांनी संतप्त भावना व्यक्त करत, पंचशील ध्वजाची विटंबना करणार्या वर कार्यवाही करण्याची मागणी केली.

मोर्चा मध्ये माजी युवा मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी, नांदेड जिल्ह्याध्यक्ष अनिल शिरसे, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले, शहराध्यक्ष सचिन नवघडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अकुश सावते,लोहा तालुकाध्यक्ष नारायण जोंधळे,माधव हतिअंबिरे, रावसाहेब व्हावुळे, पालम तालुकाध्यक्ष सुर्यकांत रायबोले, यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी होते.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी लोहा माजी नगराध्यक्ष पंचशिल कांबळे सह वंचित पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

पंचशील ध्वज हा आंबेडकरी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे.पंचशिल ध्वजाची विटंबना कोणत्या ही परिस्थिती त सहन केली जाणार नाही.

दोषींवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला,.

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail