“नियोजन ‘शुन्य’,गोंधळ ‘शंभर ‘! जनगणनेचा फज्जा.

नांदेड प्रतिनिधी:-नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनगणनेचे काम सुरू झाले आहे.

पण त्या कामाच्या नियोजनात त्रुटी दिसत आहेत.

प्रत्येक गावातील भागासाठी तयार केलेला नकाशा स्पष्ट सिमा दाखवत नाही.व तो नकाशा झुम करुनही पाहता येत नाही.त्यामुळे शिक्षक व कर्मचारी संभ्रमात आहेत.

जर शासनाने नकाशा मध्ये गावातील वार्ड दाखवला असता तर कर्मचाऱ्यांना भाग वाटुन घेण्यास स्पष्टता आली असती.

काही ठिकाणी ॲप चालत नाहीत.तर काही ठीकाणी कर्मचाऱ्यांना OTP च येत नाही.त्यामुळे शिक्षकात व कर्मचार्यात तिव्र नाराजी पसरली आहे.

काही ठिकाणी कर्मचारीच भेटत नाहीत.कर्मचार्याच्या अभावा मुळे जनगणना पुर्ण होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

बर्याच कर्मचाऱ्यांनी यातुन सुट घेतल्यामुळे कामात वेग नाही.

शिक्षक व कर्मचारी यांना दिलेले साहीत्य निकृष्ट दर्जाचे दिसत आहे.जसे मार्कर पेन थोडा वेळ चालल्यानंतर बंद पडते.

योग्य नियोजना अभावी जनगणनेची वाट लागते की काय असे वाटू लागले आहे.

प्रशासनाने यात गांभीर्याने दखल घेऊन योग्य नियोजन करून जनगणनेचा कार्यक्रम पार पाडावा..

 

Satya Nyay
Author: Satya Nyay

Leave a Comment

Traffic Tail